गुरू
गुरू ज्ञानाची घागर
गुरू प्रेमाचा सागर
गुरू मायेचा पाझर
गुरू संस्कार जागर
गुरू माणुसकी झरा
गुरू आपुलकी वारा
गुरू चैतन्याच्या धारा
गुरू संकल्पाचा दोरा
गुरू सदाचार खाण
गुरू सद् विचार बाण
गुरू सद् गुण रान
गुरू सत शील दान
गुरू अनुभव फळा
गुरू कृतीयुक्त मळा
गुरू ज्ञानियाचा डोळा
गुरू बालकांचा लळा
गुरू विकासाची कास
गुरू ज्ञानामृत रास
गुरू विज्ञानाचा ध्यास
गुरू परिवर्तन आस
गुरू ध्येयवादी वेडा
गुरू कल्पनांचा सडा
गुरू जीवनाचा धडा
गुरू कर्तव्याचा कडा
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:- बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा