भारतीय संविधान
संविधानात महत्व
सर्वांना सार्वभौमत्व
सर्व धर्म गुणगान
धर्म निरपेक्षास मान
प्रत्येकाचे जीवन शाही
नांदते इथे लोकशाही
संविधानात न्याय
नसे कोणावर अन्याय
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
संविधानाचा मंत्र
संपविण्या सारी विषमता
दर्जा व संधीची समानता
ज्याची देशावर निष्ठा
प्रत्येक व्यक्तीस प्रतिष्ठा
राष्ट्राची एकता, एकात्मता
शिकवी संविधान बंधुता
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा