बुधवार, १७ मार्च, २०२१

शाळेला चाललो आम्ही (कविता)

 शाळेला चाललो आम्ही


शाळेला चाललो आम्ही

शाळेला चाललो आम्ही


उठूनी सकाळी सकाळी

सजूनी आवरुनी सावरूनी

भेटण्या मित्र मैत्रिणी

थांबूनीही थांबणार नाही

स्वप्रेरनेने निघालो आम्ही

उधळूनी टाकू वादळे आम्ही

रविकिरणा  सम चमकू आम्ही


शाळेला चाललो आम्ही

शाळेला चाललो आम्ही


जिच्या दारातुनी ज्ञानाचे

दरवाजे उघडती

बोलक्या भिंतीही शिकवती

ज्ञानाचे धडे आम्हा

कोणी शिकूनी होते मोठे

कोणी मागेही राहती

आमच्या नशिबाच्या रेषा

शाळेतूनीच बदलती


शाळेला चाललो आम्ही

शाळेला चाललो आम्ही


शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर

संस्काराचे माहेरघर

पेटवूनी ज्ञानाच्या ज्योती

भेदूनी दूर अज्ञान अंधार 

ज्ञानाचा पसरू प्रकाश धरणीवर

पेटती ठेवुनी ज्ञानाची मशाल

भविष्य घडवू आम्हीच आमचे विशाल


शाळेला चाललो आम्ही

शाळेला चाललो आम्ही


                 कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप (बार्शी)

              9405237081















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...