बुधवार, १७ मार्च, २०२१

शब्दांकुर (कविता)

         शब्दांकुर

      

शब्द शब्दांकुर व्हावे

वाचूनी लागावा छंद

निसर्ग ,पाउस, वारा

मनास करावे धुंद


शब्द सप्तरंगी व्हावे

रंगात शब्दांच्या दंग

निखारे,शब्द फुलवू

शांतता राहो अभंग


शब्द  बनावे पाखरू 

फुटावे शब्दास पंख

अन्याय फोडीता वाचा

 मारावे जोरात डंक


शब्द जोडीता शब्दास

अचूक बांधावा बंध

वाहत सुटावा गोड

फुलांचा  मधाळ गंध


शब्द भक्तीरस व्हावे

भक्तीत होऊनी गुंग

समाज सुधारा साठी

बांधा काव्यरूपी चंग



श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

       9405237081


जाणिवा परिवर्तनाच्या प्रातिनिधिक कविता

 संग्रहात प्रकाशित


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...