बुधवार, १७ मार्च, २०२१

आमचे राजे (कविता)

 “आमचे राजे”


जिजाऊ च्या पोटी

जन्मला बाळ

गुंफिली त्यांनी

हिंदवी स्वराज्याची माळ


मावळातील पोरं त्यांनी

केली सगळी गोळा

फुलवला स्वराज्याचा

देखणा भगवा मळा


कडेकपारीतून सह्याद्रीच्या

शोधील्या चोर वाटा

शत्रूचा काढिला 

शक्कल  लढवुनी काटा


शत्रूसंगे लढताना वापरला

सदाच गनिमी कावा

आम्हास वाटे त्यांच्या

पराक्रमाचा हेवा


मावळ्यांचं त्यांच्या पाठी

होतं दहा हत्तीचं बळ

मुघलांनाही त्यांच्यापुढं

काढावा लागला पळ


सग्या सोयऱ्यानीही 

त्यांच्या विरुद्ध केलं बंड

संयमानं त्यांचं बंड ही

त्यांनी केलं थंड


कोणत्याही धर्माचा

केला नाही अनादर

कुराणाच्या प्रति परत करुनी

केला धर्म ग्रंथाचा आदर


माझ्या राजाचा 

रुबाबच होता भारी

परस्त्री मानली त्यांनी

मातेसमान नारी


लेखिले न इतर धर्मास

त्यांनी कधी कमी

धर्मानुसार जगण्याची

सर्वानाच दिली त्यांनी हमी


स्वराज्य निर्माणाचा

मनी ध्यास घेऊनी

भगवा फडकवला

उंच उंच गगणी


करितो मी राजांना

मानाचा मुजरा

त्यांच्या विचारांची धरुनी कास

जन्मदिन ,स्मृतिदिन करा हो साजरा


        श्री.युवराज गोवर्धन जगताप

           काटेगाव ता :- बार्शी

             940523781

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...