स्त्री शिक्षणाची गंगोत्री
खरंच तू सावित्री
स्त्री शिक्षणाच्या गंगेची
तूच आहेस गंगोत्री ----------।।धृ ।।
त्याकाळी लोकांना नव्हती
स्त्री शिक्षणाची किंमत
समाजाचा असताना विरोध
ज्योतिरावांच्या साथीन
तूच बांधलीस हिंमत
खरचं तू सावित्री --------------
स्वतः असताना निरक्षर
प्रथम तूच गिरवलंस अक्षर
लाखो स्त्रियांना तूचं केलंस साक्षर
खरचं तू सावित्री -----------------
कर्मठ लोकांनी दिल्या
तूला किती शिव्या
पण अंगावर चिखल शेण झेलून
तू शिकविल्या अक्षररूपी ओव्या
खरचं तू सावित्री ---------
किती सोसल्यास तू
समाजाकडून अवहेलना
परंतू स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेड
रोवणारी तूच आहेस ललना
खरचं तू सावित्री -----------
समाजाचं एकच होतं सूत्र
चूल आणि मूल
परंतू तू फुलवलसं
स्त्री शिक्षणातून
स्त्री शिक्षणाचं फूल
खरचं तू सावित्री ------------
अक्षररूपी ओव्या गिरवून
तयार झालेत ग्रंथ
पुरुषाच्या बरोबरीनं
स्त्रियाही झाल्यात बुद्धिवंत
खरंच तू सावित्री----------------
कवि
श्री युवराज गोवर्धन जगताप(बार्शी)
9405237081
प्राथमिक शिक्षक
दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा