बुधवार, १७ मार्च, २०२१

पाऊस (कविता)

                   पाऊस


रवि गेला संपावर,नभी काळोख दाटला

मेघ अंबरी जमले, वारा सुसाट सुटला


संगे वाऱ्याच्या जोरानं,ढग नभात पळती

थंड गारवा लागता, थेंब मातीवर येती


आला पाऊस दारात, मनं उधानलं सारं

झाली भेगाळली रानं,त्याचा पाण्यानच गारं


माती न्हातीधुती होते,धो-धो कोसळती धारा

थेंब टपोरे सांडती, मध्ये पडती हो गारा


ढग भांडतात नभी,वीज लकाकत येई

गुरे,माणसे धावती,शोध निवाऱ्याचा घेई


पडे पाऊस जोरात,नद्या तुफान वाहती

पाणी पडले अमाप, गावे पाण्यात पोहती


लागे पावसाची झड,रानं तनानं झाकलं

कशी करू मशागत,साऱ्या रानात चिखलं


कधी मनास आनंद,देई पाऊस पाऊस

कधी आणी ढगफुटी, जीवा लावीतसे ध्यास


कधी वाहूनही नेई, गुरं,घरदार,ढोरं

कधी संपवी सगळं, भयानक महापूर


कधी बेतात पडूनी, साऱ्या सुखावितो जगा

रानं हिरवं हिरवं, कधी फुलवितो बागा


                कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप

        (काटेगाव ता.बार्शी)

         9405237081


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...