गणेश आगमन
आला मास भाद्र
गणेश घेवूनी
मकरे सजली
फुलांच्या माळांनी
सुंदर ती मुर्ती
आणली घरात
हर्ष रे दाटला
सर्वांच्या उरात
सुखाचा निर्माता
गणेशा स्वागत
दुःख रे संहारी
पुजतो मनात
आगाडा हराळी
मस्तकी ठेवितो
नैवद्य मोदक
तुलाच दावितो
घरांच्या दारात
आनंद जोरात
आरती मुखात
चैतन्य देहात
उत्सव सोहळा
करितो साजरा
ठेव रे आनंदी
पार्वती च्या बाळा
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा