बुधवार, १७ मार्च, २०२१

बैल पोळा (कविता)

     बैल पोळा


आला रे पोळा

बैल सोहळा

बैलाला धुवा

चांगले चोळा


रिकामे सोडा

नको रे काम

चारून आणा

नको रे घाम


शिंगाना रंग

लावा बेगड

गोंडे लोकरी

शेंबी लगड


ढाल मस्तकी

गळा घुंगरू

पायी तोडे

झूल पांघरु


वरात त्यांची

आता रे काढा

माथी वेशीच्या

नारळ फोडा


पुढे वाजवा

ढोल पिपाणी

नाचा मजेत

वाजवा गाणी


लग्न बैलांची

मजेत लावा

पुराण पोळी

नैवद्य दावा


गुळ कन्यांची

पंगत बसवा

राजाला माझ्या

आज हसवा

----------------------------------


श्री.युवराज गोवर्धन जगताप

      काटेगाव ता:- बार्शी

      जि:- सोलापूर

     9405237081


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...