बुधवार, १७ मार्च, २०२१

रक्षाबंधन(दशाक्षरी रचना)

    रक्षाबंधन(दशाक्षरी रचना)


कपाळी कुंकवाचा तिलक

लावूनी भाऊराया तुजला

करी दीर्घायुष्याची प्रार्थना

प्रतीक हे मान सन्मानाचे

बहिणीच्या मनी ही कामना

 

तिलकावरी शोभे अक्षदा

प्रभाव पडो शुक्र ग्रहाचा

जीवनात सुखाची हो प्राप्ती

भाऊराया प्रति वेडी माया

बहीण मनोमनी जपती


लक्ष्मीचे फळ देऊन हाती

करी परमेश्वरा अर्चना

सुख समृद्धी नांदो घरात

तुझी प्रगती माझे रक्षण

बांधते राखी तुझ्या हातात


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता :- बार्शी

     9405237081



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...