बालपण
आठवता बालपण
जाग्या होती आठवणी
नको मज मोठेपण
हीच ईश्वरा मागणी
नसे वेळेचे बंधन
येते जगता रे मुक्त
घेता येतो रे आनंद
मौज मज्जाच रे फक्त
नसे काळजी मनात
माया सर्वांच्या उरात
खेळ खेळण्या सोबती
सदा उभेच दारात
खेळ मजेचे मजेत
दिन उगवता सुरू
कसा दिवस सरला
कळे न नका विचारू
चाले सदा दंगा खोड्या
खेळ चाले चिरघोड्या
मस्त मजेत रे उड्या
खेळे दगडाच्या गाड्या
टोले विटीला दांडूचे
गोल चकारी रे फिरे
गोट्या खिशात वाजती
खेळ आनंदाचे सारे
रोज मनास वाटते
व्हावे आपण लहान
सर्व सोडून गंगेला
उपभोगू बालपण
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा