बुधवार, १७ मार्च, २०२१

अश्रू (हायकू)

  अश्रू (हायकू)


उदरी कळा

नयनी अश्रू दाटे

काळीज फाटे


सोसुनी त्रास

वाढवते उदरी

अश्रू पदरी


कोरड्या वांत्या

अश्रू आवंढा गिळे

अपत्य मिळे


पोटी गाठोडे

सांभाळ नऊ मास

अश्रूंचा घास


सरता दिस

वेदना अश्रू काळ

जन्मते बाळ


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

    9405237081

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...