बुधवार, १७ मार्च, २०२१

प्रलय (हायकू रचना)

 प्रलय (हायकू रचना)


केरळ राज्य

बरसले आभाळ

चक्षू ओघळ


झाला प्रलय

श्रावण बरसला

जीवास हाय


पाण्याचा लोट

उध्वस्त रे संसार

लागली वाट


वेगात पूर

पाण्यावरी पसारा

मनी काहूर


वाहती सारे

बुडूनी मेले किती

जीवास भीती


निसर्ग घाला

थैमान ते पुराचे

हाल जीवाचे


जीव मारले

प्रसंग हा वाईट

पुराची लाट



घरे बुडाली

आक्रोश झाले बंद

पूर बेधुंद


राख रांगोळी

स्वप्ने गेली वाहून

जीवन होळी


पूर संकट

कसे घडले पाप

निसर्ग कोप


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता :- बार्शी

     9405237081







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...