कसे सांगू तुला
संसारी माझिया
तू हवीस मला
किती सोसले मी
कसे सांगू तुला---
नजरेत माझ्या
तुझीच ती छबी
हरपलो मी तू
सौंदर्याची खुबी---
सुंदर तू परी
जीव तुझ्यावरी
काळीज बावरे
हो माझी नवरी----
तुझ्याच नादात
पडलो वादात
जातीच्या भेदात
अडकले हात ---
तोडीली बंधने
झुगारल्या रीती
जाळीला हा भेद
जोडण्यास नाती ---
जातीच्या भिंतींना
लाविले सुरुंग
प्रिये तुझ्यासाठी
प्रेमाचा तुरुंग ----
तुझ्याच साठी रे
जीव हा जळाला
देह ही पळाला
कसे सांगू तुला ----
कवि
श्री. युवराज गोवर्धन जगताप
(काटेगाव ता.बार्शी)
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा