बुधवार, १७ मार्च, २०२१

मागोवा (कविता)

        मागोवा


माझ्या कल्पनेच्या माग

तू येत जा

माझा मागोवा

जरा घेत जा


शब्द हरवतात माझ्या स्मृतीतून

ते तू शोधत जा

सापडलेले शब्दमोती 

माझ्या काव्य माळेत गुंफत जा


माझ्या काव्य माळेची गुंफण

तुझ्या शब्दा शिवाय पोरकी आहे

माझेच हरवलेले शब्द मोती 

मला न दयायला 

काय तू परकी आहे


माझ्या जाळ्यातून निसटलेले

मोती रुपी मासे

तू तुझ्या मनरुपी नजरेच्या 

गळात अडकवत जा 



          कवि

श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:- बार्शी

       9405237081






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...