बुधवार, १७ मार्च, २०२१

कविता -अशी असावी (कविता)

 "कविता -अशी असावी"


प्रत्येक शब्दात

असावा भाव

हृदयाचा घ्यावा

तिनं भक्कम ठाव

कविता -अशी असावी


प्रत्येक शब्दात

असावा प्राण

वाढीस लागला

स्व-देशाभिमान

कविता -अशी असावी


प्रत्येक शब्दात

असावा ध्यास

कष्टाच्या घामाचा 

घुमावा सुवास

कविता -अशी असावी


प्रत्येक शब्दात

असावा आदर

पसरावी हिरवी

निसर्ग चादर

कविता -अशी असावी


प्रत्येक शब्दात

असावा हेवा

नयनी उभारावा

सुंदर देखावा

कविता -अशी असावी


प्रत्येक शब्दात

असावी वेदना

खिन्न मनातील

जागवाव्यात संवेदना

कविता -अशी असावी


प्रत्येक शब्दात

असावी क्रांती

जाती-जातीत

नांदावी सुख-शांती

कविता -अशी असावी


प्रत्येक शब्दात

असावी सल

निर्बलात आणावं

तिनं अपार बल

कविता -अशी असावी


प्रत्येक शब्दात

असावे सुहास्य

विषमतेवर करावे

पडखर भाष्य

कविता -अशी असावी


प्रत्येक शब्दात

असावी ममता

विश्वात नांदावी

समता व बंधुता

कविता -अशी असावी


             कवि

श्री. युवराज गोवर्धन जगताप (बार्शी)

         9405237081

        दि:- २९/०३/२०१८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...