बुधवार, १७ मार्च, २०२१

ये ना पावसा (कविता)

 ये ना पावसा


अरे पावसा पावसा

कोठे जाऊन बसला

गाडी ढगांची पळते

त्यात नाही रे दिसला


ढग पळती आकाशी

जोर वाऱ्याचा जोरात

वाट पाहून तुझीच

दाटे काळजी उरात


डोई दिसतात ढग

रग पाण्याची ढगात

थेंब येईना रे खाली

आग पडली पोटात


येना पाहुण्या पावसा

मन आतुर भिजण्या

रवी ओकतोय आग

नको देऊ रे डागण्या


असा कसा रे रुसला

काय आमचा रे गुन्हा

धाव मातीच्या भेटीला

फुटू दे नभास पान्हा


आस तुझ्याच भेटीची

होवू नये ताटातूट

कर माती ओलिचिंब

बंध नात्याचे अतूट


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

       9405237081

दि:- ०९/१०/२०१८





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...