गवत फुले(हायकू)
गवत फुले
निसर्ग जादू भारी
सौंदर्य दारी
गवत फुले
पाचूचा सडा जणू
वेचुनी आणू
गवत फुले
रानामंदी डुलती
मने फुलती
गवत फुले
वेगळाच हा रंग
नयन दंग
गवत फुले
किरणात न्हाली
सुवर्ण झाली
गवत फुले
वाऱ्यात डुले छान
हिरवे रान
गवत फुले
रंगीबेरंगी दिसे
धरणी हसे
गवत फुले
झोका वाऱ्यात घेती
आकाशी नाती
गवत फुले
नटली वसुंधरा
सुगंधी वारा
गवत फुले
नयनी दिसे छान
वेगळा वान
श्री. युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता :- बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा