बुधवार, १७ मार्च, २०२१

पड परतीच्या राजा (कविता)

 पड परतीच्या राजा


आले सरत महिने

नाही पाऊस पडला

पावसाळा गेला कोरा

बळी मातीत गाडला

 

पशु पक्षा नाही पाणी

सारे  कोरडे तलाव

घाम मातीत गाळून

होतो माझाच निलाव


ढग थोडाही गळेना

काय करावे कळेना

चारा हिरवा मिळेना

डोळा हाल पाहवेना


हाल अपेष्टा प्राण्यांची

लाही उठली जीवाची

किती ओढ पावसाची

वाट लागे जीवनाची


झाल्या विहिरी कोरड्या

नद्या  वाळवंट झाल्या

कशी निसर्ग करणी

भोग नशिबी आपल्या


पड परतीच्या राजा

वाट तुझीच पाहतो

नको देऊस रे दगा

व्यथा हृदयी दाबतो


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

    9405237081








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...