बुधवार, १७ मार्च, २०२१

घुसमट (दर्पण काव्य)

 घुसमट (दर्पण काव्य)


घुसमट

स्त्री जन्माची


घुसमट

शरीरावर पडणाऱ्या 

वासनांध नजरांची


घुसमट

वासनेच्या आहारी 

गेलेल्या कुत्र्यांच्या 

नजरेतील विषाची


घुसमट

विषारी नजरा 

चुकवून चारित्र्यावर 

शिंतोडे उडू 

न देण्याची


घुसमट

उसळत्या तारुण्य

आवेगाना वेळीच 

काबूत ठेवून 

शील,तन 

अकलंकीत ठेवण्याची


घुसमट


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता :- बार्शी

     9405237081

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...