बुधवार, १७ मार्च, २०२१

माझा गाव (कविता)

 माझा गाव


मागे वळून पाहता

गाव माझा आठवतो

कोपऱ्यात रे मनाच्या

स्मृती गंध साठवतो


उत्तरेस बालाघाट

सोबतीस माझ्या गावा

डोंगराच्या रांगा मस्त

दिसे सुंदर देखावा


होती एकता, एकोपा

जाती होत्या खूप जरी

हिंदू मुस्लिम एकत्र

नसे समाजात दरी


दिस आठवती सारे

होते नजर बावरी

खुणा पाऊल ढुंडाळी

मन हृदय सावरी


होता भेट सोबत्यांची

बालपण आठवते

मित्र,सख्यांच्या रे जुन्या

आठवणी जागवते


बालपण होते किती

छान अल्लड मधाळ

आम्हा पावलांचे ठसे

उमटत रानोमाळ


ओढ पावले पडती

गाव वाटेच्या दिशेला

तव अंकुर फुटती

गाव भेटीच्या आशेला


असा छान माझा गाव

नाव त्याचे काटेगाव

घेता कोणी त्याचे नाव

घ्यावी वाटे भेट राव


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:-बार्शी

       9405237081









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...