कष्टाची गाणी
सारा संसार गाडीत
रोज नव्याच फडात
वाहे जीवन कष्टात
राबे पोटासाठी हात
तोडी ऊस भराभर
हात पाचट साळती
अंगी घामाची अंघोळ
तन उसांनं कापती
मोळ्या बांधून उसाच्या
गाडी जोमानं भरती
बैल जुंपून गाडीला
कारखाना रे गाठती
नाही तमा ऊन वारा
डोई रवी चढो पारा
कष्ट माऊली संसारा
दुःख तयासी विचारा
बैलासवे राबे माय
हाती कासरा धरुनी
बैल ओढती रे गाडी
गोळा आतडी करुनी
साथ माझिया संसारा
देती बैलही कष्टानं
बैलाच्याच जीवावर
करी संसार नेटानं
घरदार रे सोडुनी
जीव हिंडे रानोरानी
रोज उपसूनी कष्ट
गाती कष्टाचीच गाणी
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा