काव्यांजली
विजयादशमी (दसरा)
काढुनी कचरा
धुवून सारी कपडे
बदलले रुपडे
घराचे
पानावर देव
घट घालते सुवासिनी
पूजा मनातूनी
देवीची
नऊ दिवस
उपवास करी निरंकार
मनीचे विकार
सोडूनिया
दिन दहावा
येई घेऊन दसरा
रागद्वेष विसरा
सर्वकाळ
विचार वाईट
टाका सर्व जाळूनी
रहावे मिळूनी
एकोप्याने
करा सीमोल्लंघन
दुष्ट प्रवृत्तीचे थेट
घ्यावी गळाभेट
मनोभावे
आपट्याची पाने
लहानथोरा देऊन हाती
जपुया नाती
विश्वासाने
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा