बुधवार, १७ मार्च, २०२१

राजे परत आलात तर -- (कविता)

 राजे परत आलात तर --


राजे तुम्ही परत आलात

तर होईल बघा बरं

सगळीकडं वाहिलं बघा

आनंदी आनंद वारं             ।।धृ।।


बारभाई गोळा करून

तुम्ही निर्मिली समता 

सगळ्यांचे वेगळे झेंडे

समाजात दिसतेय विषमता   ।।१।।


नामोहरम  करण्या शत्रूला

वापरला  सदा गनिमीकावा

जाहीराती चा भडीमार आता

सगळा नकली फक्त देखावा    ।।२।।


परस्त्री मानली माता

अब्रूवर पडू न दिले हात

बेअब्रू करण्या सारसावलेत

आता कित्तेक जणांचे हात    ।।३।।


हिंदवी स्वराज्य निर्माणा

तुमची तळपली तलवार

क्षुल्लक कारणा इथे

चौकात होतात वार               ।।४।।


दिनरात  घाम गाळून

मरत्यात कुणब्याची पोरं

उठवला आवाज तर म्हणती

आलाय का तुला जोर ।।५।।


आजही हर-हर महादेव

घोषणा पडतेय कानी

तुम्हा शोधण्या फिरताहेत 

पाय कडेकपारीतुनी                 ।।६।।



श्री. युवराज गोवर्धन जगताप (बार्शी)

         9405237081

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...