पिवळे पान (हायकू )
पिवळे पान
अनुभव पुस्तक
नत मस्तक
पिवळे पान
तारुण्याची ओहोटी
हातात काठी
पिवळे पान
विकारांचे माहेर
देह आहेर
पिवळे पान
आजार पण काळ
वेदना जाळ
पिवळे पान
वार्धक्याचे दर्शक
अंत शीर्षक
पिवळे पान
देहाची शिथिलता
हतबलता
पिवळे पान
ओसरला बहर
दावी स्मशान
पिवळे पान
जीवन समारोप
निवांत झोप
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:- बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा