नागपंचमी (हायकू)
सरे आषाढ
आला श्रावण मास
माहेर आस
सण पंचमी
बंधू येई मुराळी
खुलली कळी
सजूनी सया
पूजा वारुळा करी
माहेरा दारी
कृषिक मित्र
रक्षितो धन धान्य
कमवी पुण्य
नाग पंचमी
देऊ नागास मान
मित्र महान
श्री.युवराज गोवर्धन जगताप
काटेगाव ता:-बार्शी
9405237081
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा