बुधवार, १७ मार्च, २०२१

जाती अंत (कविता)

                 जाती अंत


माणुसकी हीच आमुची माना हो जात

सांगून गेलेत महंत,साधू आणि  संत

परी जाती जातीत भयाण वैर, भांडणे

सांगा कधी होणार आहे जातीचा अंत


कशाला हवे वेगळे झेंडे अन वेगळ्या वाटा

नको कोणा माज अन जातीचा नको नायटा

जातीभेद विषमतेला देऊनी सारेच फाटा

भारतीय बंधूंनो जाती अंता चे शिखर गाटा


संविधानाने दिलेत सर्वांना हक्क समान 

प्रत्येकांनी धर्माप्रमाणे आचरण करा गुमान

जातिभेदाचे पेरू नका कोणी वादळी  तुफान

समाजातील मानवतेचे जीवन होईल विरान


जन्मास येऊन जेंव्हा पेटते जीवन वात

जन्मदाखल्यास लगेच घट्ट चिटकते जात

शाळा प्रवेशात अगोदर तिलाच नोंदतात

कधी संपणार आहे ही जातीची काळरात


जन्मताच पुसून टाका जातीचा हा डाग

बनवू नका जातीला जीवनाचा रे भाग

मानवता, समानतेला येऊ द्या जरा जाग

कायम जाळून टाका जातीची विषारी आग


नका विणू आपल्या भोवती जातीचे जाळं

जातीसाठी कधी घडवू नका दंगा जाळपोळ

खणून काढा खोल रुजलेली जातीची मुळं

माणसांनो मानवतेची,समतेची जोडा नाळं


श्री.युवराज गोवर्धन जगताप

     काटेगाव ता:- बार्शी

     9405237081



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...