बुधवार, १७ मार्च, २०२१

गुलमोहोर (कविता)

 "गुलमोहोर"


गुलमोहोर

फुलांचा तो ताटवा

साज वाटावा


गुलमोहोर

गिरी फुलांचा लाल

रंग महाल


गुलमोहोर

लाली सांडतो दाट

पहावा थाट


गुलमोहोर

रंग उधळी नभा

सुंदर प्रभा


गुलमोहोर 

धुके पसरी लाल

जणू गुलाल


गुलमोहोर

करी मनास धुंद

निसर्ग गंध



श्री. युवराज गोवर्धन जगताप (बार्शी)

         9405237081

        दि:- ०२/०४/२०१८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

गंध मातीचा (हायकू रचना)

 गंध मातीचा (हायकू रचना) पाऊस भेट तप्त मातीशी होता हर्षली लता गंध मातीचा कस्तुरीसम वाटे तनात दाटे मृदा सुगंध तन मना भुलवी जीव फुलवी गंधी हास...